एचआयव्ही निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात आज जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागातर्फे ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एचआयव्ही निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अधिष्ठात डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याहस्ते आज गौरव करण्यात आला.

ऑनलाईन स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक असणाऱ्या विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविणात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी – संजय पहुरकर यांनी केले. यावेळी मंचावर कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर, कार्यक्रम व्यवस्थापक नीरज महाजन, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी प्रमोद बोराखेडे उपस्थित होते.  मा.डॉ. नागोराव चव्हाण – जिल्हा शल्य चिकित्सक व मा.अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव याना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविनायत आले.

वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येक घटकाने “मिशन मोड” मध्ये काम केले तर रुग्णालय हे सुजलाम सुफलाम होते. त्यासाठी आपले महाविद्यालय व रुग्णालय हे राज्यभरात आदर्श होऊ शकते. प्रत्येकाने आपल्या कामात झोकून देऊन काम केले तर आपण नक्कीच यशाची भरारी घेऊ शकतो असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे  अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.

येथील जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध पथक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे जिल्हाभरात ज्यांनी एचआयव्ही नियंत्रण व प्रतिबंधासाठी उत्तम कार्य केले त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन बुधवारी ६ जानेवारी रोजी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  या कार्यक्रमासाठी गिरीश गडे, शुभांगी पाटील,  मोजीन खान, रुपाली दीक्षित, प्रशांत पाटील, सुवर्णा साळुंखे, मनीषा वानखेडे, उज्ज्वला पगारे आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content