जळगावात चोरीच्या दुचाकीसह चोरट्यास अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरुण परिसरातील जोशीवाडा येथे चोरीच्या दुचाकीसह  चोरट्यास गुन्हेशाखेने आज  6 जानेवारी रोजी अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पेलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून संशयीत गोपाळ यास एमआयडीसी पेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

गोपाळ भगवान कोळी (वय-50)  असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.  चार वर्षापुर्वीच म्हणजेच 2016 मध्ये चोरुन आणलेली दुचाकी जोशीवाडा येथील गोपाळ कोळी वापरत असल्याची गुप्त माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. बकाले यांनी त्याच्या पथकातील विजयसिंग पाटिल, जितेंद्र पाटिल, नितीन बाविकस्कर, राहुल पाटिल, प्रितम पाटील अशांच्या पथकाला रवाना केले होते. संशयीताचा शोध घेत असतांना तो, जळगाव शहरात नसुन किनोद येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने यावल तालूक्यातील किनोद येथे जाऊन गोपाळ भगवान कोळी याला अटक केली. पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांना सोपवण्यात आले आहे.

 

Protected Content