पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात बनावट अपघात दाखवून खून करण्यात आलेल्या गुन्ह्याचा पर्दाफाश करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला.
अमळनेर पोलीस ठाण्यांतर्गत अकस्मात मृत्यू क्रमांक ४०/२०२५ अंतर्गत दाखल असलेल्या प्रकरणाची सखोल तपासणी करताना पोलिसांनी हे अपघात नसून योजनाबद्ध खून असल्याचे उघड केले. आरोपींनी अपघाताचा बनाव करून विमा कंपनीकडून लाखो रुपयांचा लाभ मिळवण्याचा डाव रचला होता. यात नवीन स्कुटी, घराचा विमा आणि विमा रकमेची अफरातफर करण्याचा प्रयत्न होता.
या तपासात उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, हेड कॉन्स्टेबल सुनिल हाटकर, अभिजीत पाटील, आणि अनिल राठोड यांनी दोन आरोपींना अटक करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, तसेच विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अतुल पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभात धीरज महाजन, मुकुंद चौधरी, बापू महाजन, भूषण टिपरे, रमेश पाटील, ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह तालुक्यातील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांनीही पोलिसांच्या कार्याचे खुले दिलाने कौतुक केले आणि भविष्यातही असेच गुन्हे उघडकीस आणावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.