ब्रेकींग : मजुरांनी भरलेला ट्रक उलटला; १५ जण जखमी !


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बेलसवाडी गावाजवळ मजूर घेऊन जात असलेला आयशर ट्रक उलटून झालेल्या अपघातात सुमारे १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, एका आयशर ट्रकमधून मजूर रावेरच्या दिशेने जात होते. बेलसवाडी गावाजवळ अचानक ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक उलटून पडला. यात सुमारे १५ स्त्री-पुरूष जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे जखमींमध्ये काही बालकांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जेसीबीच्या मदतीने आयशर ट्रक हलविण्यात आला होता. तर या संदर्भात पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.