रावेर- पुनखेडा – पातोंडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन


रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर – पुनखेडा – पातोंडी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आज राजू महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. आमदार अमोल जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी या रस्त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये निधी मंजूर केला होता.

या रस्त्याच्या नूतनीकरणामुळे मुक्ताईनगर – रावेर प्रवास अधिक सुखकर होणार असून नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला यानिमित्त पूर्णविराम मिळाला आहे.

मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आज भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून रस्ता अत्यंत खराब झाल्याने वाहनधारक व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

या भूमिपूजन सोहळ्यास माऊली फाउंडेशन अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, भाजप प्रदेश सदस्य सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख उमाकांत महाजन, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस संदीप सावळे, आमदार अमोल जावळे यांचे स्वीय सहायक संदीप पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष दुर्गेश पाटील, रविंद्र पाटील, सूर्यकांत देशमुख, माजी तालुकाध्यक्ष महेश चौधरी, राजन लासूरकर, तालुका उपाध्यक्ष साजन चौधरी, बाळा आमोदकर, पुनखेडा सरपंच किर्ती पाटील, सामाजिक कार्यकर्ते उद्देश कचरे, वासू नरवाडे, दुर्गादास पाटील, पवन महाजन, अरुण शिंदे, नितीन पाटील, समाधान पाटील, तसेच रस्त्याचे ठेकेदार चिंतन जैन यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.