चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील मुस्तफा एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारणी मंडळाच्या उपाध्यक्ष पदी अरमान अली असगर अली तसेच कार्यकारणी सभासद पदी अकिलोद्दीन अमिनोद्दीन जहागीरदार यांची निवड झाली.
तसेच शालेय समितीच्या चेअरमन पदी फिरोज खान हाजी महेबूब खान तसेच सदस्य म्हणून सैय्यद जुनेद अली लियाकत अली यांची निवड झाली. निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष असगर अली महेबूब अली, सोबत सचिव, सर्वसाधारण सभासद, कार्यकारणी सभासद तसेच मुख्याध्यापक अब्दुल हक शेख अय्युब शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.