कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात राष्ट्रीय शिबिरास सुरुवात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन, जळगाव यांच्या आयोजनात राष्ट्रीय स्तरीय “एक भारत श्रेष्ठ भारत शिबीर –II” कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २७ ऑक्टोबर २०२३ रोजी कर्नल अभिजित महाजन यांच्या नेतृत्वात सुरु झाला आहे. यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र डायरेक्टरेट या दोन राज्यातील एकूण ६०० एन.सी.सी. चे छात्र सैनिक सहभागी झाले आहेत. उत्तर प्रदेशातून १५० छात्र सैनिक तर ४५० छात्र सैनिक महाराष्ट्राच्या विविध जिल्हातून आलेले आहेत.

२८ ऑक्टोबर रोजी शिबिराची सुरुवात कर्नल महाजन यांच्या उद्द्भोदनाने झाली. यात शिबिराचे उद्देश हे लक्षवेधी आहेत. शिबिराचे मुख्य उद्देश म्हणजे छात्र सैनिकांनी समुदाय जगणे, जातीय सलोखा भावना विकसित करणे, आपसात संघभावना, श्रमाची प्रतिष्ठा, ज्ञान मिळवणे आणि मानवी मुल्यांची जोपासना करणे होय. या शिबिरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात वाद-विवाद स्पर्धा, प्रश्न मंजुषा, प्रादेशिक गीत गायन, प्रादेशिक नृत्य, लघु नाटिका, राष्ट्रीय एकात्मतेवर फ्लेग अरेया, खोखो, रस्सी खेच, व्हॉलीबॉल या बहुआयामी व्यक्तिमत्व घडविणाऱ्या स्पर्धा यात घेण्याचे नियोजिले आहे.

तसेच अजिंठा येथील लेण्यांना भेट, जैन हिल्स येथे कृषी आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास संदर्भात या दरम्यान आयोजित केलेले आहेत. विद्यापीठाच्या विशेष सहकार्याने रोजगार निर्मिती साठीच्या संधी या संबधी कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. भारत विकास परिषदेच्या सहकार्याने ‘भारत को जानो’ या संदर्भात प्रश्न मंजुषा आणि वादविवाद स्पर्धांचे निरीक्षण करण्यात येणार आहे.

या शिबिराच्या यशस्वीततेसाठी लेफ्ट. कर्नल पावन कुमार, सुभेदार मेजर प्रेमसिंग, एन.सी.सी. अधिकारी मेजर स्मिता चौधरी (पी.ओ. नहाटा महाविद्यालय), कॅप्टन (डॉ.) योगेश बोरसे (मूळजी जेठा महाविद्यालय), कॅप्टन अश्विनी कुमार (गोरखपूर, उत्तर प्रदेश), लेफ्ट. शिवराज मानके (नूतन मराठा महाविद्यालय), एफ.ओ. किशोर चवरे (नागपूर), एस.ओ. पंकज भंगाळे (सावदा), जी.सी.आय. अलका रोय, सुभेदार अनिल कुमार आणि परेड निरीक्षक, कार्यालयीन कर्मचारी यांचे योगदान लाभत आहे.

Protected Content