वृध्द महिलेला कारण नसतांना तिघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील पिंप्राळा हुडको येथे कारण नसतांना ६४ वर्षीय वृध्द महिलेला तीन जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण करून दुखापत केली आणि जीवेठा मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात आशा रतनलाला जैन वय ६४ या वृध्द महिला आपल्या नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. शनिवारी २ मार्च रोजी सकाळी १० वाजता कोणतेही कारण नसतांना याच परिसरात राहणारे फरीद खाटीक, शाहीस्ता फरीद खाटीक आणि उज्ज्वला (पुर्ण नाव माहित नाही) या तिघांनी वृध्द महिलेला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर दुपारी २ वाजता वृध्द महिलेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तिघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार फरीद खाटीक, शाहीस्ता फरीद खाटीक आणि उज्ज्वला (पुर्ण नाव माहित नाही) तिघे रा. पिंप्राळा हुडको, जळगाव या तिघांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बोरूडे हे करीत आहे.

Protected Content