विश्वकर्मा वंशीय समाज संघटना महाराष्ट्रच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी चेतन अढळकर यांची निवड

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असुन, यावल येथील समाजसेवक चेतन अढळकर यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नागोजीराव पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष बजरंग खर्जुले यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य संघटक भगवान वाघ यांच्या नेतृत्वात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून चेतन दिलीप अढळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समाजाप्रती निष्ठावान कार्यकर्ते व जनजागृती व मोलाचे सहकार्य असणारे असे त्यांची समाजात ओळख आहे महाराष्ट्र राज्याचे सुरू असलेले समाज संघटन व उन्नतीचे कार्य वृद्धिंगत कण्याच्या प्रक्रियेस आपणास हे पद सोपवण्यात येत आहे असे संस्थापक अध्यक्ष नागोजीराव पांचाळ यांनी पत्र देताना म्हटले व संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चेतन दिलीप आढळकर यांची समाजाप्रती भरीव योगदान असल्यामुळे त्यांना ही मोठी जबाबदारी देण्यात आली त्या ठिकाणी उपस्थित जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी राज्य संघटक भगवान वाघ, राजेंद्र निकम, निलेश सोनवणे, प्रमोद रुले, प्रवीण शिरसाट, संजय भालेराव, विकास पाथरे आदी समाज बांधव उपस्थित होते. त्यांचे जिल्हासह तालुक्यातून निवडीचे स्वागत करण्यात येत आहे. या संदर्भात लवकरच चेतन अढळकर उत्तर महाराष्ट्र क्षेत्राचा दौरा करणार असल्याचे सांगुन,समाज बांधवांची संघटनात्मक बांधणी करुन समाजाच्या हिताचे उपक्रम व विविध समस्या अडीअचणी सोडवण्याकडे आपण लक्ष देणार असे चेतन अढळकर यांनी मत व्यक्त केले

Protected Content