मोठी बातमी : तलवार घेवून दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शाहू नगरातील पडकी शाळेजवळ हातात लोखंडी तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला शहर पोलीसांनी कारवाई करत अटक केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्फराज जाविद भिस्ती वय २० रा. शाहू नगर, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शाहू नगरातील पडकी शाळेजवळ संशयित आरोपी सर्फराज भिस्ती हा हातात लोखंडी तलवार घेवून परिसरात दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी १ मार्च रोजी सांयंकाळी ६.३० वाजता शाहू नगरात कारवाई करत संशयित आरोपी सर्फराज भिस्ती याला अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी शनिवारी २ मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजता पोलीस हेडकॉस्टेबल किशोर निकुंभ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सर्फराज भिस्ती याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर हे करीत आहे.

Protected Content