वाहन लावण्यावरून तीन जणांवर प्राणघातक हल्ला

प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात असलेल्या नीलकमल हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियेसाठी आलेल्या डॉ. नीरज चौधरी यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर वाहन लावण्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार रविवारी सकाळी घडला आहे. नार‌ळ विक्रेत्याने थेट कोयत्याने वार केल्याने एका जणाला जखम झाली. या ठिकाणी आलेल्या एका महिलेनेदेखील मी पोलिस आहे, असे म्हणत डॉक्टरांना मारहाण केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. नीरज चौधरी हे रविवार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पांडे चौक परिसरातील नीलकमल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी त्यांचे सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोडे यांच्यासह कारने (क्र. एमएच १९, सीएफ ५६२८) आले होते. ही कार त्यांनी रुग्णालयासमोर उभी केली व ते मध्ये जात असताना एक जण तेथे आला व या जागेवर मी नारळाची गाडी लावतो, तुम्ही गाडी काढून घ्या असे सांगितले. परंतू डॉ. निरज चौधरी हे रूग्णालयात निघून गेले. त्यानंतर नारळ विक्रेते दोन जण यांनी डॉक्टरची कॉलर पकडून मारहाण केली. नाराळाच्या विक्रेत्यांपैकी एकाने कोयता काढून वार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान डॉ. निरज चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content