परिवर्तनतर्फे विद्यार्थ्यांसाठी कला शिबिराचे १५ ते १९ मे दरम्यान आयोजन

f02b5f45 b061 495d abc8 a3a2cdce178e

 

जळगाव (प्रतिनिधी) परिवर्तन जळगाव संस्थेतर्फे जळगाव शहरातील मुलामुलींसाठी “कला शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे. उन्हाळयातील सुट्टीच्या दरम्यान विद्यार्थ्यांना कलेचे शिक्षण मिळावं तसेच कले विषयीची बीजे त्यांच्या मनात रुजावीत यासाठी नृत्य,  नाटक आणि चित्रकला या तिघांचा समुच्चय असलेले ‘3 D’ शिबिर डांस, ड्रामा व ड्रॉइंग’ परिवर्तन संस्थेतर्फे दिनांक 15 मे ते 19 मे 2019 या कालावधीत सकाळी 7 ते 11 या वेळेत विद्या इंग्लिश स्कूल, मेहरून बगीच्या जवळ येथे घेण्यात येणार आहे.  पाच वर्षापासून पंधरा वर्षे वयोगटातील मुला-मुलींना या शिबिरात प्रवेश दिला जाणार असून हे शिबिर सर्वांसाठी मोफत आहे.

 

 

परिवर्तन कला शिबिरात विद्यार्थ्यांना कलेविषयी योग्य प्रकारे शिक्षण दिले जाणार आहे. नृत्याचे धडे हे विविध प्रकारच्या प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाणार आहे. चित्रकला हा विषय विद्यार्थ्यांना आवडणारा व त्यांच्या मनातल्या सुप्त संकल्पना कागदावर उतरता येऊ शकतात यासाठी रंग रेषा यांच्याशी विद्यार्थ्यांचे नातं जोडत त्यांना शिकवले जाणार आहे. नाटक ही कला मुलांना धैर्य व आत्मविश्‍वास देणारी आहे. नाटकाच्या माध्यमातून अभ्यासाकडे कसे वळता येऊ शकते, यासाठी अनेक पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांना नाट्यकलेचे प्राथमिक शिक्षणही या शिबिरात मुलांना देण्यात येणार आहे. हे शिबिर सर्वांसाठी निशुल्क असून प्रवेश मर्यादित असल्याने लवकरात लवकर नाव नोंदणी करणे आवश्यक असून प्रवेश अर्ज व माहितीपत्रक ‘कट्टी बट्टी’ कॅफे रेस्टोरंट, सॉफ्टेड कम्प्यूटरच्या समोर, एम जे कॉलेज रोड येथे मिळणार आहेत.  या शिबिरात नृत्य कलेसाठी जागृती भिडे, चित्रकलेसाठी हर्षदा पाटील व नाटक कलेसाठी योगेश पाटील शिबीर प्रमुख असून या शिबिरासाठी कला क्षेत्रा मधील अनेक तज्ञ मार्गदर्शक आमंत्रित करण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांना उपकारक ठरणार आहे.  या शिबिरा मधून मुलांमधील कलेचा शोध घेऊन भविष्यात  त्यांच्या मधील कलागुणांचा विकास केला जाणार आहे .या साठीच हे 5 दिवसीय कला शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या कला शिबिरासाठी विद्या फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे.

 

 

मंजुषा भिडे , नारायण बाविस्कर , पुरुषोत्तम चौधरी , हर्षल पाटिल, सुदीप्ता सरकार,  होरीलसिंग राजपूत , मंगेश कुलकर्णी , मनीषा बाविस्कर , नीलिमा जैन, सुनीता दप्तरी, अंजली पाटिल , मनोज पाटिल, किशोर पवार , वसंत गायकवाड़ , उदय सपकाले , विनोद पाटिल , विशाल कुलकर्णी , प्रतीक्षा कल्पराज , हर्षदा कोल्हटकर , मिलिंद जंगम, हे शिबिर यशस्विटेसाठी प्रयत्नशील असणार आहे. ही सुट्टी परिवर्तन कला शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंद देणारे देणारी ठरणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवर्तन तर्फे अध्यक्ष शंभु पाटील यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content