सिंधी कॉलनीतून ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी करणारा चोरटा अटकेत

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून ट्रॅक्टरची बॅटरीची चोरी करणाऱ्या संशयित आरोपी आतीष नरेश भाट रा. नवल कॉलनी जळगाव याला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातील बॅटरी जप्त करण्यात आली आहे.

या संदर्भात माहिती अशी की, दिलीप शिवप्रकाश चांगरे (वय- ६०) हे नवल कॉलनी शिंधी कॉलनी शेजारी, जळगाव इथे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. चांगरे हे शेती काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे शेतीसाठी ट्रॅक्टर आहे. दरम्यान १९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर त्यांनी घरासमोर ट्रक्टर पार्किंग करून लावले होते. अज्ञात चोरट्याने ८ हजार रुपये किंमतीची ट्रॅक्टरची एक्साइड कंपनीची बॅटरी चोरून नेल्याचे उघडकीला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ हेमंत काळसकर यांच्याकडे होता. ट्रॅक्टरची बॅटरी चोरी करणारा चोरटा निष्पन्न झाल्यानंतर संशयित आरोपी आतिष नरेश भाट रा. नवल कॉलनी याला गुरूवारी २० जानेवारी रोजी सकाळी अटक केली. त्याच्याकडून चोरीची बॅटरी हस्तगत केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. हेमंत कळसकर, सुधीर सावळे, विकास सातदीवे, योगेश बारी, पो.कॉ. चंद्रकांत पाटील यांनी केली.

Protected Content