किराणा दुकान फोडून ९० हजाराची रोकड लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शिवाजी नगरातील किराणा दुकानाचे शटर वाकवून दुकानातील ड्राव्हरमधून ९० हजारांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे.  याबाबत चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगरातील क्रांती चौकात आनंद मदनलाल नागला यांचे मदनलाल पांडुरंग नागला या नावाने किराणा दुकान आहे. शुक्रवारी दि. १ रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास दुकान बंद करुन ते घरी गेले. शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी ते दुकानावर आले असता, त्यांना दुकानाचे शटर मध्यभागून उचकविलेल्य अवस्थेत दिसून आले. त्यांनी तात्काळ दुकानात जावून पाहणी केली. यावेळी त्यांना गल्ल्यातून पैसे चोरी झाल्याचे कळताच नागला यांनी शेजारच्यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी काहीच माहित नसल्याची सांगताच नागला यांना दुकानात चोरी झाल्याची खात्री झाली. चोरट्यांनी नागला यांच्या दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले ८५ हजारांची रोख रक्कम व ५ हजारांची चिल्लर असा एकूण ९० हजारांचा मुद्देमाल लांबविल्याचे दिसून आले. नागला यांनी तात्काळ घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर आनंद नागला यांच्या तक्रारीवरुन शनिवार २ जून रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content