विधानसभा अध्यक्षपदी साळवी यांना निवडून आणा – शिवसेनेचा आमदारांना व्हिप

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन रविवार दि. ३ जुलैपासून संपन्न होणार असून उद्या विधानसभा सभागृहात अध्यक्षांची निवड होणार आहे. या पदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांनी अर्ज भरला असून शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी साळवी यांना मतदान करावे असा पक्षादेश शिवसेनेने यांनी काढला आहे.

महाविकास आघाडीकडून राजन साळवीं यांच्या नावावर विधानसभा अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं असून याच पदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर यांनीही अर्ज भरला आहे. त्यामुळे नार्वेकर विरुद्ध साळवी अशी लढत होणार असून आगामी काळात अध्यक्ष महोदय असं कुणाला संबोधलं जाणार याचा निर्णय उद्या होणार आहे.

दरम्यान शिवसेनेने आपला उमेदवार उभा करून निवडणुकीची चुरस वाढवली आहे. शिवसेनेचे राजन साळवी यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने सर्व आमदारांना व्हिप बजावला आहे. यामध्ये शिंदे गटातील आमदारांना देखील उद्या व्हीप बजावला आहे. आता एकनाथ शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत असून महाडचे आमदार भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती केली आहे.

एकनाथ शिंदेच्या गटाने देखील या अगोदर व्हीप बजावला असल्याने  शिंदे यांचा गट उद्धव ठाकरेंच्या गटाला भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी व्हीप जारी करण्याची शक्यता आहे. आता शिवसेनेत दोन गट पडल्याने आमदार कोणता पक्षादेश पाळतात याची सर्वांना उत्सुकता आहे.

Protected Content