बंडखोर आमदार ‘गोवा टू मुंबई’

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशनात उद्या विधानसभा सभागृहात अध्यक्षांची निवड होणार असून त्यासह बहुमत चाचणीसाठी शिवसेनेचे बंडखोर आमदार आज गोव्यातून मुंबईकडे निघाले आहेत. एका तासात ते मुंबईमाध्ये पोहोचणार असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

शिंदे गटाचे आमदार आज ११ दिवसांनंतर मुंबईत दाखल होत असून त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी तदडा बंदोबस्त ठेवला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज डोमेस्टिक एयरपोर्ट च्या गेट क्रमांक ९ मधून ते बाहेर पडणार असून या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी ढोल ताशे आणण्यात आले आहेत.

तीन विशेष बसच्या माध्यमातून हे आमदार एयरपोर्टमधून बाहेर येणार असून आमदार ज्या मार्गाने जाणार त्या मार्गावर विशेष कॉरिडॉर पोलिसांनी केला आहे. मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्यात येणार आहे.

मुंबई वाहतूक पोलीस गिरगांव चौपाटीजवळ रस्त्यावर कोणतेही वाहन उभे करू देत नाहीत. कारच्या क्रमांकाच्या मदतीने ते मालकांशी संपर्क साधून त्यांना कार काढण्यास सांगत आहेत. मुंबईत एअरपोर्ट ते ओबेरॉय हॉटेलपर्यंत जागोजागी रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात

Protected Content