महाविकास आघाडीचे सरकार पडणार म्हणजे भाजपचे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ : गुलाबराव पाटील ( Video )

जळगाव (प्रतिनिधी) आपले आमदार शाबूत ठेवण्यासाठी भाजपकडून हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आमदार फुटू नयेत म्हणून भाजपकडून केविलवाणा प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पडेल, मग आपले सरकार येईल. आपले मंत्री होऊन आपली कामे होतील, अशा प्रकारची लालसा भाजप आपल्या आमदारांना दाखवत आहे. पण आमचे सरकार पाच वर्षे सुरळीतपणे चालणार आहे. महाविकासआघाडीचे सरकार पडणार म्हणजे भाजपचे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत, असा टोला राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव पाटील यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. भाजपच्या सरकार कोसळणार असल्याच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. महाविकास आघाडीचे सरकार पडणार, असा दावा भाजपकडून कितीही सुरू असला तरी त्याला काहीही अर्थ नाही. सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचा हा दावा सुरू आहे. राजस्थानचे सरकार पडणार अशी चर्चा होती. राजस्थानचे सरकार आम्ही पाडू, असा दावा भाजपने केला होता. मात्र, आपण पाहिले की राजस्थानच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. राजस्थानचे बहुमत पाहिले तर ते अवघे १० ते २० मतांचे होते. आपल्याकडे १७० आमदार एकत्र आहेत. म्हणजेच सरकार पडणार हे भाजपचे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत, असे ना. पाटील म्हणाले. तर अधिकाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रक्रिया आहे. त्यात काहीही गैर प्रकार झालेला नाही. मागील सरकारमध्ये एकाच महिन्यात दोन-दोन, तीन-तीन बदल्या झालेल्या मी पाहिल्या आहेत. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप म्हणजे सरकारला तसेच मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचेही गुलाबराव पाटील (gulabrao patil) म्हणाले.

 

याप्रसंगी गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पार्थ पवार यांच्याविषयी नाराजी आहे असं सांगितलं जातं शरद पवार साहेब हे सर्व सर्व आहे शरद पवार हे त्यांचे आजोबा असून राजकारणाच्या पलीकडे त्यांचे नाते आहे. आजोबांना कान पकडण्याचा त्यांचा अधिकार आहे. यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेत कोणतेही वाद नसल्याचे मत त्यांनी प्रकट केले. तर, दुसरीकडे ठाकरे असल्यानेच आदित्य ठाकरे यांना हे पद दिलं अशी चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांना बिहारचं पदी लागेल आम्ही काही बोलत नाही ज्याच्यात क्षमता आहे त्याला पद मिळेल असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

 

खालील व्हिडीओत पहा ना. गुलाबराव पाटील नेमके काय म्हणालेत ते ?

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/599699907414323/

 

 

 

jalgaon, jalgaon news, jalgaon lalest news, jalgaon breaking news, jalgaon today news, gulabrao patil, sharad pawar, ncp, ncp jalgaon, sharad pawar news, gulabrao patil latest news, gulabrao patil news

Protected Content