उभ्या कंटनेरला भरधाव टँकरची धडक : एक ठार, एक जखमी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा चौफुली जवळील हॉटेल मानस समोर येथे उभ्या कंटेनरला धुळ्याकडून भुसावळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिल्याने कंटेनरचालक चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला तर सोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर असे की, शहरातील अजिंठा चौफुलीवरील हॉटेल मानस समोरील मोकळ्या जागेवर  सकाळी ६ वाजेच्या सुमारास केमीकलचे ड्रमने भरलेला कंटेनर (क्रमांक एमएच ४६ एच ६४९७) चालक दिलीप मारूती पाखरे रा. पिंपळगव्हाण ता. पाथरी जि. नगर आणि नामदेव भीमराव महाजन रा. धामणगाव ता. आष्ठी जि. बीड हे दोघे पार्कींगला लावत होते. चालक दिलीप पाखरे आणि नामदेव महाजन हे गाडीजवळ उभे होते. ६.२० वाजेच्या सुमारास धुळ्याकडून भुसावळकडे जाणारा टँकर (एमएच ४३ बीपी ५५६९) भरधाव वेगाने येवून उभ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेनर चालक दिलीप पाखरे हे चाकाखाली आल्याने त्याचा जागीच ठार झाले तर नामदेव महाजन हे गंभीर जखमी झाले. अपघात होता टँकर चालक टँकर सोडून पळ काढला होता. याप्रकरणी नामदेव महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content