Home राजकीय मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक ; राज ठाकरेंनाही निमंत्रण

मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक ; राज ठाकरेंनाही निमंत्रण

0
38


मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात ‘कोरोना’चे संकट गडद होत असताना सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह 18 पक्षांच्या नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण आहे.

 

आज दुपारी दोन वाजता सर्वपक्षीय बैठक होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या बैठकीला उपस्थिती लावणार असल्याचे वृत्त आहे.


Protected Content

Play sound