सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांचे स्पर्धा परिक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे सोमवारी ३ ऑक्टोबर रोजी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.

जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पोलीस मुख्यालयाच्या मागे असलेल्या मंगलम हॉल येथे सेमीनारचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातील स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

याप्रसंगी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, आजचे विद्यार्थी हे हुशार आहे. त्यामुळे प्रत्येकजण स्पर्धा परिक्षा देण्याची तयारी करत आहे. परंतू स्पर्धा परिक्षा, त्याची माहिती आणि योग्य मार्गदर्शन व्यवस्थिरित्या मिळत नसल्याने स्पर्धा परिक्षांमध्ये फारसे यश मिळत नाही. यूपीएससीच्या माध्यमातून देशातील उच्च पदावर देशाची सेवा करता येते. यात आयएएस, ईआरएस, आयपीएस सारखे अधिकारी होवू शकतात. त्यामुळे आपले लक्ष गाठण्यासाठी परिश्रम हेच एकमात्र साधन असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून प्रश्नांचे निरसण केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

Protected Content