बसमध्ये चढतांना महिलेच्या पर्समधून रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव ते चोपडा बसमध्ये चढत असतांना महिलेच्या पर्समधून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकुण ४० हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना धरणगाव बसस्थानकात गुरूवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, भारती जालिंदर पाटील वय-४० रा. कुकावल ता.शहादा जि. नंदूरबार या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरूवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता या महिला धरणगाव बसस्थानकात आलेल्या होत्या. त्यावेळी धरणगाव ते चोपडा बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील ४ हजारांची रोकड आणि ३६ हजारांचे सोन्याचे दागिने असा एकुण ४० हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले. हा प्रकार घडल्यानंतर महिलने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील हे करीत आहे.

Protected Content