ग्रीन पार्क परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील ग्रीन पार्क परिसरात एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवार ७ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी दुपारी ४ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक असे की, वसीम खान सलीम खान (वय-३१) रा. मिल्लत नगर, भुसावळ हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदनिर्वाह करतो. ६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता वसीम खान याने त्याची दुचाकी क्रमांक (एमच १९ बीएस ३७८०) शहरातील ग्रीन पार्क येथील गुलमोहर अपार्टमेंट येथे पार्कींगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे गुरूवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता उघडकीला आले. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळून आली नाही. अखेर दुपारी ४ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश चौधरी करीत आहे.

Protected Content