महापालिकेत रक्तदान शिबीराचे उद्घाटन !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून जळगाव महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर बुधवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले.

आपण समाजाचे देणं लागतो या अनुषंगाने गणेशोत्सवाचे औचित्य साधुन जळगाव महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात बुधवार ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. महापालिकेचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याहस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान करावे, जेणे करून गरजवंताला त्याला लाभ होवून त्यांचे जीवन वाचवू शकेल. असे आवाहन आयुक्त डॉ. गायकवाड यांनी केले आहे.

रक्तदान शिबीर हे इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पथकातील तज्ञ व्यक्तींनी रक्तदानाविषयी माहिती देवून जनजागृती केली आहे. या कार्यक्रमाला उपायुक्त शाम गोसावी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, वैद्यकीय अधिकारी संजय पाटील, रेडक्रॉस सोसायटीचे ए.एम.चौधरी, मंगेश पाटील, दिशा कांबळे, जमील शेख, संजय ठाकूर, वैभव धर्माधिकारी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/631571295059608

 

 

Protected Content