यावल येथे सेल्फी पॉईंटचे पो.नि. सुधीर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

यावल प्रतिनिधी । टोकियो येथे होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचे १० खेळाडू सहभागी होत असून यावल तालुक्यातील तरुण युवकांना प्रेरणा मिळावी, यासाठी ऑलम्पिक जागरण या उपक्रमाचे आज पोलीस स्टेशन आवारात पो.नि. सुधीर पाटील यांच्या हस्ते सेल्फी पाँईंटचे उद्घाटन करण्यात आले. 

क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव व यावल तालुका युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ तसेच यावल तालुका क्रीडा स्पर्धा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने टोकियो येथे होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचे १० खेळाडू सहभागी होणार आहेत. तर किनगाव इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूलचे सचिव व व्हि.मार्टचे संचालक मनिष विजयकुमार पाटील व प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी हवेत फुगे सोडून आंनद उत्सव साजरा केला.

या प्रसंगी यावल पंचायत समितीचे  गटशिक्षणाधिकारी नईम शेख, मुलींचे विकास विद्यालय यावलच्या मुख्याध्यापिका निशा पाटील व कन्या विद्यालय यावलच्या मुख्याध्यापिका पुष्पा अहिरराव इतर सह ग्रामीण क्षेत्रातील क्रिडाप्रेमी उपस्थीत होते ,तालूक्यात क्रिडाक्षेत्रात खेडाडूंचा उत्साह वाढावा या हेतूने स्व.केतनदादा मल्टिपर्पज फाऊंडेशन किनगावचे अध्यक्ष व इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे सचिव मनिष विजयकुमार पाटील यांनी या कार्येक्रमाला संपुर्ण आर्थीक मदत केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुञसचंलन यावल तालुका क्रिडा समन्वयक व मुख्याध्यापक के.यु.पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन वाय.जी.कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे क्रिडाशिक्षक दिलीप बिहारी संगेले,एम.व्ही.ठाकुर पञकार महेश पाटील व सुनील गावडे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content