सरपंच परिषदतर्फे पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय ग्रामपंचायत बंद आंदोलनात कोरपावलीचा सहभाग

यावल प्रतिनिधी | सरपंच परिषद मुंबईच्या माध्यमातून आज तालुक्यात पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय ग्रामपंचायत बंद आंदोलनात कोरपावली ग्रामपंचायतीने आपला सहभाग नोंदवला.

यावल तालुक्यात सरपंच परिषद मुंबई या संघटवेच्या माध्यमातून संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा वढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार, दिनांक २२ डिसेंबर रोजी राज्यातील सरपंच संघटना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे एक दिवसासाठी ग्रामपंचायत बंदची हाक दिली होती.

त्यामध्ये सर्व सरपंच सहभागी झालेत. ग्रामपंचायतीच्या सरपंचच्या ग्रामसेवकांच्या एकत्रित विकास कार्यामध्ये भेडसावणाऱ्या समस्या, त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत सरकार दुर्लक्ष करत आहे. या बाबीची दखल घेऊन सरपंच संघटनांनी आज ग्रामपंचायत बंदची हाक दिली. त्या हाकेला साद म्हणून आज कोरपावली ग्राम पंचायतने कुलूप लावून आंदोलनात सहभाग नोंदवला.

यावेळी कोरपावली चे सरपंच विलास नारायण अडकमोल, ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, सिकंदर तडवी, ग्राम पंचायत लिपिक किसन तायडे, शिपाई सलीम तडवी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी ग्रामस्थांनी देखील उपस्थिती दर्शवून या आंदोलनास सहकार्य केले .

Protected Content