फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

WhatsApp Image 2019 10 15 at 2.14.47 PM

फैजपूर, प्रतिनिधी | येथील धनाजी नाना महाविद्यालयात क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय भारत्तोलन,शक्तित्तोलन (महिला/पुरुष) व शरीरसौष्टव (पुरुष) या खेळ प्रकारात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि एरंडोल अश्या चारही विभागातील पुरुष आणि महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. या क्रीडा प्रकारांमध्ये ३४ महिला व १२८ पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला.

फैजपूर येथे विभागीय क्रीडा स्पर्धेच्या आंतर विभागीय भारत्तोलन,शक्तित्तोलन (महिला/पुरुष) व शरीरसौष्टव (पुरुष) या खेळांचे  उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिल भंगाळे व उद्घाटक म्हणुन वरीष्ठ क्रीडा संचालक डॉ. बी. एल. पाटील उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, प्रा. सतिष कोगटा, प्रा.संजय चौधरी, जळगाव विभाग सचिव प्रा. पी. आर. चौधरी , धुळे विभाग सचिव प्रा.तेजस शर्मा, प्रा. लिंबाजी प्रताळे, प्रा. हर्शदा पाटील, प्रा. डॉ. चॉंद खॉ, प्रा. सचिन पाटील, प्रा. डॉ. शैलेश पाटील, प्रा. उमेश पाटील तसेच निवड समिती सदस्य प्रा. दिनेश तांदळे, प्रा. मुकेश पवार, प्रा. महेश पाटील, प्रा. प्रमोद पटेल, प्रा. डॉ. सतिष चौधरी, जिमखाना समिती चेअरमन इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. बी.एल.पाटील यांनी विद्यापीठाने या खेळामध्ये केलेल्या प्रगतीचा इतिहास वाचला तसेच खेळातील प्रगतीसाठी सराव अत्यंत महत्वाचा आहे असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ए.आय.भंगाळे यांनी मनुष्य जीवनात प्रत्येक व्यक्ती दैनंदिन कार्य करतांना कसल्या ना कसल्या प्रकारचे साहित्य किंवा वजन उचलत असतो. त्यामुळे एक प्रकारे व्यक्ति रोज भारत्तोलन खेळाचा सराव करत असतो. आज या स्पर्धेचे उद्घाटन करत असतांना भारत्तोलन आणि बुद्धीबळ या दोन्ही खेळाचे उद्घाटन म्हणजे शक्ती आणि बुद्धी यांचा संयोग होय. भारत्तोलन या खेळात वजन उचलतांना ताकदी सोबत युक्ती महत्वाची आहे तर बुद्धीबळ या खेळात युक्तीसोबत ताकद महत्वाची आहे असे सांगितले आणि सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन प्रा. डॉ. जी. एस. मारतळे यांनी केले. प्रस्ताविक डॉ. सतिष चौधरी यांनी केले तर आभार प्रा. शिवाजी मगर यांनी मानले. स्पर्धेत भारत्तोलन, शक्तित्तोलन व शरीरसौष्टव (पुरुष) या तिनही प्रकारात जळगाव विभाग विजयी झाला. भारत्तोलन व शक्तित्तोलन (महिला) क्रीडा प्रकारात जळगाव विभाग विजयी, धुळे विभाग शक्तित्तोलन व शरीरसौष्टव (पुरुष) प्रकारात आणि भारत्तोलन महिला प्रकारात तिस-या स्थानी राहिले. एरंडोल विभाग शक्तीत्तोलन व शरीरसौष्टव (पुरुष) व भारत्तोलन महिला प्रकारात द्वितीय स्थानी राहिले. भारत्तोलन पुरुष प्रकारात तिसरा क्रमांक प्राप्त केला. नंदुरबार विभागाने भारत्तोलन (पुरुष) या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. बुद्धीबळ या क्रीडा प्रकारात जळगाव विभाग पुरुष प्रकारात विजयी तर महिला प्रकारात उपविजयी राहिले. धुळे विभाग महिला प्रकारात विजयी तर पुरुष प्रकारात उपविजयी राहिले. एरंडोल विभाग पुरुषांमध्ये आणि नंदुरबार विभाग महिलांमध्ये तृतीय स्थानी राहिले. या स्पर्धेच्या पारितोषक वितरण प्रसंगी जिमखाना समितीचे चेअरमन प्रा. डॉ. सतिष चौधरी अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी शरीरसौष्टव स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ शरीर सौष्ठव पटूचा क.ब.चौ.उ.म.वि.श्रीचा बहूमान वितरीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ. जी. ए. मारतळे यांनी केले तर पंच म्हणुन प्रा. मुकेश पवार, प्रा. सुभाष वानखेडे, प्रा.उमेश पाटील यांनी कार्य केले. तसेच तांत्रिक समितीचे सदस्य म्हणुन डॉ.संजय चौधरी, डॉ.पी. आर. चौधरी यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी युवराज गाढे, आर.डी.ठाकुर, प्रकाश भिरुड, कन्हैया फेगडे, पंकज मोरे, तुषार सपकाळे, अल्लाउद्दीन तडवी, धम्मदिप मेघे, योगेश महाजन, अतुल महाजन आदिंनी सहकार्य केले.

Protected Content