ईद सणापर्यंत मार्केट उघडू नका ; हिंदू मुस्लिम बांधवांची मागणी

फैजपूर, प्रतिनिधी । शहरात कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी खबरदारी म्हणून रमजान ईद पर्यंत खरेदी-विक्रीसाठी मार्केट उघडण्याची परवानगी देवू नये अश्या मागणीचे निवेदन इन्सिडेंट कमांडर तथा फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना आज देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणुंचे रुग्ण हे सर्वाधिक आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे. परंतु, असे असले तरी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव अद्यापही यावल – रावेर तालुक्यात झालेला नाही. तसेच फैजपूर शहरात कोरोना विषाणुंचा शिरकाव झालेला नाही व तो होवू सुध्दा द्यायचा नसल्याने जिल्हाधिकरी यांनी दररोज संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. कोरोना विषाणुंचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन असून नागरिक त्यांचा कामधंदाबंद करुन घरात थांबून आहेत. .त्यातच रमजान महिना सुरु असून रमजान ईद तोंडावर आहे. त्यामुळे जर फैजपूर शहरात मार्केट सुरु करण्याची परवानगी दिली तर लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद करुन घरी बसलेले लोक खरेदी विक्रीसाठी घराबाहेर पडतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. मार्केट सुरु झाल्याने बाहेरील गावचे व्यापारीसुध्दा व्यापार करण्यासाठी चोरी छुप्या मार्गाने फैजपूर शहरात दाखल होतील व एकदमच सर्वत्र गर्दी होईल. या गर्दीमध्ये जर एखादा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आला तर त्याच्यामुळे संपूर्ण फैजपूर शहरात व परीसरात कोरोना विषाणुंचा फैलाव होऊन रमजान ईदला गाल-बोट लागेल. कोरोनाचे काही लक्षणे दिसत नसल्यावरही चांगल्या माणसालाही तो होवू शकतो. यामुळे जर मार्केट खुले केले तर फैजपूर शहरात कोरोना विषाणुंचा प्रार्दुभाव वाढून सर्वत्र पसरेल फैजपूर शहरातील व परीसरातील नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल. फैजपूर शहरात व परिसरात कोरोनाविषाणुचा शिरकाव होवू देवू नये असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर उपनगराध्यक्ष रशीद तडवी, भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता शेख कुर्बान, काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, अब्दुल रऊफ जनाब, माजी नगरसेवक शेख जफर, शिवसेना नगरसेवक अमोल निंबाळे, नगरसेवक देवेंद्र साळी, सामाजिक कार्यकर्ते शेख जलील हाजी सत्तार, रवींद्र होले, डॉ. अब्दुल जलील, सय्यद कौसर अली, आसिफ मॅकनिकल, शाबाज खान हाजी शकील खान, काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनवर खाटीक, सामाजिक कार्यकर्ते रईस मोमीन, इरफान शेख, मोहसीन उर्फ सागर खान यांच्यासह फैजपूर शहरातील जवळपास तीनशे हिंदू -मुस्लीम बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content