पाचोरा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काढली सुरेख रांगोळी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी |    पाचोरा न्यायालयातील बेलीफ पदावर कार्यरत असलेले संदिप बाबुराव पाटील यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त न्यायालयीन आवारात डोळ्यांचे पारणे फेडणारी सुरेख अशी रांगोळी काढून सर्वांच्या मनात घर निर्माण केले आहे.

 

संदिप पाटील उत्कृष्ट रांगोळीकार सोबतच त्यांचे अंगी विविध कलागुण असुन उत्कृष्ट कवी, सुंदर हस्ताक्षर, फलक लेखन यासोबतच उत्कृष्ट गायक देखील आहेत. त्यांच्या कलागुणांचे दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, एम. जी. हिवराळे (मॅडम), सह दिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे, वकील मंचचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील, उपाध्यक्ष अॅड. चंदनसिंग राजपुत, सचिव अॅड. राजेंद्र पाटील, सहा.अधीक्षक जी आर पवार, अमित दायमा, तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ सहाय्यक दिपक बाविस्कर, कनिष्ठ सहाय्यक दिपक तायडे, सर्व वकील, न्यायालयीन कर्मचारी वृंद यांचेसह परिसरातील नागरिकांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

Protected Content