मोठी बातमी : शिवसेनेच्या मालकीचे प्रकरण घटनापीठाकडे – सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असता याबाबत पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची निर्मिती करून याकडे हे प्रकरण सुपुर्द करण्याचे निर्देेश न्यायालयाने दिले आहेत.

शिवसेनेवर नेमकी मालकी कुणाची यावरून सुप्रीम कोर्टात न्यायालयीन लढाई सुरू आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी शिवसेनेवर हक्क सांगितला असून या संदर्भात एकमेकांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. कोर्टाने यावर एकत्रीत सुनावणी घेण्याचे निश्‍चीत केले असून या अनुषंगाने सुनावणी होत आहे. यावर आधी ४ ऑगस्टला सुनावणी झाली. यानंतर ७ रोजी यावर कामकाज होऊन नंतर १२ ऑगस्ट रोजी याला पुढे ढकलून २२ ऑगस्ट तारीख देण्यात आली. या अनुषंगाने काल दिनांक २२ रोजी याची सुनावणी होणार असल्याचे मानले जात होते. तथापि, सुनावणी ही पुन्हा एकदा पुढे गेली असून यावर मंगळवार २३ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचे काल सांगण्यात आले होते.

आज या याचिकांवर आज सुनावणी सुरू करण्यात आली. सरन्यायाधिश रामण्णा, हीमा कोहली आणि कृष्ण मुरारी यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यात घटनापीठाकडे वर्ग करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या निर्देशांमध्ये सुप्रीम कोर्टाने पाच न्यायाधिशांच्या घटनापीठाचे गठन करण्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आता या पाच न्यायाधिशांमध्ये नेमका कुणाचा समावेश असेल ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने दोन दिवसापर्यंत सत्ता संघर्षात कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश देखील न्यायालयाने दिला आहे. दोन दिवसांनी या प्रकरणी घटनापीठाच्या समोर सुनावणी होणार आहे.

Protected Content