शास्त्री टॉवरच्या बंद दरवाजाला हार घालून भाजपातर्फे महापालिकेचा निषेध

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रविवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता शास्त्री टॉवर येथे अभिवादन करण्याकरिता भाजपा कार्यकर्ते आले असता त्यांना टॉवरचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. या अनुषंगाने भाजपाने जळगाव महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करून दरवाजाला हार घालून महापालिका प्रशासनाचा निषेध केला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती रविवारी २ ऑक्टोबर रोजी देशात साजरी केली जात आहे. या अनुषंगाने त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळी ९ वाजता भारतीय जनता पार्टी महानगरचे महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते शास्त्री टॉवर येथे आले. परंतू महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शास्त्री टॉवरचा दरवाजाला कुलूप लावलेले आढळून आले. यावर भाजपाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून मुख्य दरवाजाला हार घालून तीव्र निषेध करत महापालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी महानगरप्रमुख दिपक सुर्यवंशी, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीने इंगळे, महिला आघाडीच्या प्रमुख दिप्ती चिरमाडे, नगरसेविका अॅड.सुचिता हाडा, नगरसेविका दिपमाला काळे आदी उपस्थित होते.

Protected Content