तांबापूरा परिसरातून एकाची रिक्षा लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तांबापुरा येथील श्यामा फायरजवळील किस्मत टी सेंटर जवळून एकाची ४० हजार रुपये किमतीची रिक्षा चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत शनिवार १ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जाकीर बिस्मिल्ला बागवान (वय-४९) रा. बिलाल चौक, तांबापुरा हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता त्यांनी त्यांची रिक्षा (एमएच १९ जे ७२२४) ही तांबापुर येथील शामा फायर जवळील किस्मत टी सेंटर येथे पार्किंगला लावले होती. दरम्यान मध्यरात्री अनिल रमेश चौधरी (वय-४०) रा. आयोध्या नगर, जळगाव याने ४० हजार रुपये किमतीची रिक्षा चोरून नेली. हा प्रकार शनिवारी १ ऑक्टोबर रेाजी सकाळी उघडकीला आला. जाकीर बागवान यांनी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अनिल रमेश चौधरी रा. अयोध्या नगर, जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी अनिल चौधरी याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील करीत आहे.

Protected Content