खळबळजनक : सासऱ्याकडून सुनेचा गळा दाबून खून !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील टाकळी प्र.चा. गावात सासरा आणि सून यांच्यात झालेल्या कौटुंबिक वादातून सासऱ्याने सुनेला गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सासर्‍याला अटक करण्यात आली आहे.

उत्तम पुंजाजी चौधरी (वय-५६) रा. शिवशक्ती नगर, टाकळी प्रचा ता. चाळीसगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर कविता गोकुळ चौधरी (वय-२५) मयत महिलेचे नाव आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम पुंजाजी चौधरी (वय-५६) हे सून कविता गोकुळ चौधरी (वय-२५) व परिवारासह वास्तव्याला आहे. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता उत्तम चौधरी व सून कविता चौधरी यांच्यात कौटुंबिक वाद निर्माण झाला. या वादातून उत्तम चौधरी यांनी संतापाच्या भरात सून कविता चौधरी हिचा गळा, नाक व तोंड दांबून तिला जीवे मारून खून केल्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात उत्तम पुंजाजी स्वतः हजर राहून खुनाची कबुली दिली आहे. चाळीसगाव पोलिसांनी संशयित आरोपी उत्तम चौधरी याला अटक केली असून त्याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी करीत आहे.

Protected Content