पाचोरा बाजार समितीची वार्षीक सर्वसाधारण सभा उत्साहात

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी १ ऑक्टोबर रोजी बाजार समितीच्या मूख्य यार्डात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

सभेस प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार किशोर पाटील होते. तर सभा माजी आमदार तथा बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रशासक अनिल महाजन, रणजित पाटील, चंद्रकांत धनवडे, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे
चेअरमन संजय वाघ, माजी सभापती दिगंबर पाटील, दगाजी वाघ, जयंतराव पाटील, नानासाहेब देशमुख, मा. जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, शाम भोसले, नितीन तावडे, बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरुडे, उपसचिव प्रतिक ब्राम्हणे, व्यासपीठावर होते.

ओबीसी नेते अनिल महाजन हे गेल्या काही महिन्यांपासून पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासकपदी विराजमान झाले असुन त्यांनी त्यांच्या राजकीय अनुभवाच्या जोरावर बाजार समितीचा कायापालट करण्यासाठी चंग बांधला असुन त्याप्रमाणे त्यांचे कार्य देखील वाखाण्याजोगे असल्याने बाजार समितीत असेच कार्य पुढे देखील सुरु ठेवण्याच्या उद्देशाने आ. किशोर पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत अनिल महाजन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी प्रकाश पाटील, जयसिंग परदेशी, विलास जोशी, खलील देशमुख, प्रा. भागवत माहलपूरे, राजेंद्र पाटील सह मोठ्या संख्येने बाजार समितीचे सभासद, शेतकरी, आडत व्यापारी, हमाल मापाडी सह बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी व्यापारी, हमाल मापाडी व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Protected Content