यावल येथील बालाजी रथोत्सवाचा कार्यक्रम रद्द

यावल प्रतिनिधी । येथील सुमारे ११५ वर्षांची परंपरा असलेला बालाजी रथोत्सवाचा कार्यक्रम कोरोना संसर्गा मुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्‍वभुमीवर प्रथमच ही यात्रा खंडीत होत आहे.

गेल्या ११५ वर्षापासून हनुमान जयंतीच्या दिवशी येथील श्री बालाजी रथोत्सव असतो. त्या निमीत्ताने सायंकाळी हरिता-सरिता नदीच्या पात्रात एक दिवशी मोठ्या यात्रोत्सवाचे आयोजन तसेच चोपडा रस्त्यावरील भवानी मातेच्या बारागाड्या ओढल्या ओढण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येते. यावर्षी बुधवारी दिनांक आठ एप्रिल रोजी होणारे हनुमान जयंतीच्या दिनी श्री बालाजी रथउत्सव व या निमित्ताने भरणारी यात्रा आता होणार नाही. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमास तसेच यात्रोत्सवास शासनाने परवानगी देण्यास नकार दिल्याने रथगृहावरच रथाची रथोत्सव समीतीचे अध्यक्ष चंद्रकात गंगाधर देशमुख यांचे हस्ते पुजा करण्यात येवून या उत्सवाची सांगता होईल असे देशमुख यांनी सांगीतले .

इतिहास : माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांचे आजोबा कै. पांडूरंग धोंडू देशमुख व तत्कालीन प्रतीष्ठितांनी सन १९१४ मध्ये रथोत्सवाला सुरुवात केली होती़ तेव्हापासून ही परंपरा अखंड सुरू आहे. रथावर श्री बालाजी महाराजांची प्रतिमा आरूढ आहे. जुन्या पिढीतील रामजी मिस्त्री अत्यंत कलाकुसरीने नगरशोभेसाठी विनामुल्य रथ करून दिला असल्याचे जुन्या पिढीतील जाणकार सांगतात. ़शहरातील अरूंद व चढ-उताराचे रस्ते, रथाची भव्य उंची व सुमारे १२ टन वजन पाहता या रथास मोगरी लावणे, आणी त्यास वळविणे ही कामे अत्यंत अवघड असून कसब पणास लावावे लागते. यासाठी पुर्वीपासूनची नेमलेली मंडळीच ही कामे करतात. रथासोबत असलेले विशिष्ट पेहरावातील भालदार-चोपदार मंडळी आकर्षण असते़

कोरोनाचे सावट : कोरोनाने संपूर्ण जगभर थैमान घातल्याने देशातील व राज्यातील सर्व सार्वजनिक उत्सव रद्य झाल्याने या वर्षाचा येथील रथोत्सवही रद्य करण्यात आला आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने आधिच उदासीन असलेल्या शहरवासीयांनाही हा उत्सव रद्द होणार असल्याचे ज्ञात होते त्यामुळे एकत्रीत गदीर्र् करण्यापेक्षा शासनाने घेतलेल्या निर्णयास शहरवासीयांनी व भाविकांनी सुध्दा याला तयारी दर्शविल्याचे दिसून येत आहे.

Protected Content