युवाशक्ती फाऊंडेशनची गणेशोत्सव कार्यकारिणी जाहीर

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | युवाशक्ती फाऊंडेशनची गणेशोत्सव २०२२ साठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी प्रितम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

 

युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन २००९  पासून काव्यरत्नावली चौक जळगाव येथे आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. युवाशक्ती फाऊंडेशनची बैठक नुकतीच संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, सचिव अमित जगताप, मनजीत जांगीड, राजेश नाईक यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली असून गणेशोत्सवासाठी सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. सदर गणेशोत्सवाचे हे १४  वे वर्ष असून कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.

यामध्ये अध्यक्ष-प्रितम शिंदे, उपाध्यक्ष-रोहीत भामरे, सचिव-सौरभ कुळकर्णी, खजीनदार-आयुष दस्तुरे, पूजाविधी प्रमुख-तृशांत तिवारी, कार्याध्यक्ष-राहूल चव्हाण, सहकार्याध्यक्ष-यश लोढा, चिटणीस-अजय खैरनार, मिरवणूक प्रमुख-सयाजी जाधव, प्रसिद्धी प्रमुख-भटू अग्रवाल, युवती विभाग प्रमुख-संस्कृती नेवे, देखावा प्रमुख-शिवम महाजन, सांस्कृतिक विभाग प्रमुख-सागर सोनवणे, कार्यकारीणी सदस्य-जयेश पवार, दिक्षांत जाधव, करण जांगीड, महेश लाड, पियुष हसवाल, नवल गोपाल,  प्रशांत वाणी, पियुष तिवारी, धनराज धुमाळे, महेंद्र शिंपी, राहूल ठाकूर, अमोल गोपाल, संदिप सूर्यवंशी, प्रशांत गायकवाड, तुषार गायकवाड, भवानी अग्रवाल, भुषण सोनवणे, मयुर जाधव, हितेश सेठीया, पंकज सुराणा, पवन माळी, श्रेयस मुथा, तेजस दुसाने, विक्की धोतरे, यश चोरडीया, मिलिंद पाटील, तेजस जोशी, अतुल कानडे, जितेंद्र अत्तरदे, महेश भालेराव, हितेश पाटील, रोहीत सोनार, संकेत छाजेड, पवन भालेराव, भुषण मंगले, विकास अत्तरदे, अमोल सोनवणे, दीपक धनजे आदींची समावेश आहे.

Protected Content