पहुर येथील श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त आयोजित यात्रोत्सवास भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला . छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सकाळी श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करून यात्रोत्सवाला प्रारंभ झाला प्रारंभ झाला. श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर येथे गेल्या १९ वर्षांपासून शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सुरू आहे.

पहूर आणि पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संगमेश्वर महादेव मंदिर सकाळपासूनच गर्दीने फुलले होते. सकाळी माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे व सहकाऱ्यांनी भाविकांना साबुदान्याचा प्रसाद वाटप केला. हरिभक्त परायण रमेश महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून शिव महापुराण कथा पारायण करण्यात येत आहे . श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर यात्रेत परिसरातील व्यावसायीकांनी पुजा – प्रसाद , खेळणी , शितपेय, फराळ , गृहपयोगी वस्तूंची दुकाने थाटली होती.

पहूर गावात यात्रोत्सव सुरू झाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला . यशस्वीतेसाठी श्री . क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रदीप लोढा, सचिव हरि राऊत, विश्वस्त अशोक जाधव, माधव घोंगडे, सुरेश राऊत, ईश्वर हिवाळे, मयुर करंकार यांच्यासह ग्रामपंचायत पहूर कसबे सरपंच आशाताई जाधव, पहूर पेठ सरपंच अबू तडवी, सर्व ग्रामस्थांचे भाविक परिवाराचे सहकार्य लाभत आहे. पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला .

Protected Content