शहीद जवान यश देशमुख यांना सर्वोदय संस्थेकडून पिंपळ वृक्षांची लागवड करून आदरांजली

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील सामनेर येथील सर्वोदय हरित निर्माणच्या हरियोद्ध्यांकडून चाळीसगांव तालुक्यातील पिंपळगांव येथील रहिवासी मराठा बटालियनचे जवान यश देशमुख दि. २६ नोव्हेंबर २०२० रोजी जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले, त्यांचे हे बलिदान कायम स्मरणात राहवे या समर्पित भावनेने सर्वोदय संस्थेच्या हरित निर्माण उपक्रमांतर्गत हरित योद्ध्यांनी पुढाकार घेत गावातील सुटीवर आलेल्या जवानांच्या हस्ते वृक्ष लागवड करून आदरांजली वाहिली.

चाळीसगांव तालुक्यातील पिंपळगांव येथील रहिवासी मराठा बटालियनचे शहीद जवान स्व. यश दिगंबर देशमुख यांना “”सैनिकांचे गांव”” म्हणून ओळख असलेल्या पाचोरा तालुक्यातील सामनेर गावात सर्वोदय हरित निर्माण अंतर्गत हरियोद्ध्यांनी पुढाकार घेत गावातील सुटीवर आलेले जवान भूषण पाटील, सोपान साळुंखे, राहुल पाटील, प्रमोद पवार व नौसेनेतील प्रशांत साळुंखे,भूषण पाटील यांचे शुभहस्ते जि. प.प्राथमिक शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करून शहीद जवान यश देशमुख यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी वयाच्या २१ व्या वर्षी देशासाठी प्राण दिलेल्या जवानाचे बलिदान व्यर्थ न जावो हीच भावना प्रत्येकाची होती व पाकिस्तानला कुत्र्याच्या शेपटीची उपमा देऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. सर्वोदय हरित योद्ध्यांच्या पुढाकाराने आज रोजी शाळेच्या आवारात शहीद जवान यश देशमुख यांच्या श्रद्दांजली निमित्त लागवड केलेली पिंपळ वृक्षांची रोपे ही विद्यार्थ्यांसह अनेकांना प्रेरणा देतील व शहीद जवान यश देशमुख यांचे बलिदान कायम स्मरणात राहील असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख धीरज पाटील यांनी केले.

यावेळी लागवड केलेल्या वृक्षांना “शहीद जवान स्व. यश दिगंबर देशमुख वृक्ष” असे नांव देण्यात आले. सहभागीनमध्ये पाचोरा तालुका शेतकी संघाचे संचालक आर. टी. पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन चंदू साळुंखे, उपक्रमशील शिक्षक ह.भ.प. आर. ए. कोळी, पत्रकार प्रा.राजेंद्र साळुंखे, महेंद्र साळुंखे, बंटी पाटील, इंजि. प्रशांत पाटील, शिवराज पाटील, चेतन सोनकुळ, सोमनाथ पाटील, विजय पाटील, दादा नेरपगार, अविनाश पाटील, कन्हैया चव्हाण, सर्वोदय संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व सर्वोदय हरित निर्माणचे सर्व हरियोद्धे व युवकांनी वृक्ष लागवड करत जवानास आदरांजली वाहिली.

Protected Content