भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, दुसरा जखमी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सोनखेडी फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शुक्रवारी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल नवल भिल वय २७ रा. निमझरी ता. अमळनेर असे मयत तरूणाचे नाव आहे.

अमळनेर तालुक्यातील सोनखेडी फाट्याजवळून सुनिल भिल हा त्याचा मित्र प्रविण शंकर भिल याच्या सोबत दुचाकी एमएच १८ एके १४७९ ने दुचाकीने गुरूवार ७ मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास निमझरी गावाकडे येत होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सुनिल भिल हा जागीच ठार झाला तर शंकर भिल हा गंभीर जखमी झाला. जखमी तरूणाला अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शुक्रवार ८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॅा विजय भोई हे करीत आहे.

Protected Content