जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराजवळील रायसोनी महाविद्यालयाजवळ दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघात प्रकरणी शुक्रवार ८ मार्च रोजी मध्यरात्री १२.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, चंद्रकांत शंकर बोरनारे वय ४९रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हे आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीवाय २७२०) ने बुधवार ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जळगावकडून शिरसोली येथे जात असतांना रस्त्यावरील रायसोनी महाविद्यालयासमोर समोरून येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीपी ५४२९) ने जोरदार धडक दिली. या अपघातात चंद्रकांत बोरनारे हे गंभीर जखमी झाले. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी शुक्रवारी ८ मार्च रोजी मध्यरात्री १२.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीधारक गणेश संदीप सोनार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॅा समाधान टहाकळे हे करीत आहे.