राष्टवादी युवती कॉंग्रेसतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

 

जळगाव, प्रतिनिधी ।  जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व महिलांचे आरोग्य व आव्हान यासह विविध बाबींवर मार्गदर्शनचा कार्यक्रम राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा दिपिका भामरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.  

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी डॉ. आस्था अग्रवाल,  उद्योजिका संध्या सूर्यवंशी , सामाजिक कार्यकर्त्या मंगला पाटील , रूपाली वाघ  , निवेदिता ताठे , डॉ. सौ. सुषमा चौधरी उपस्थित होत्या. यावेळी डॉ. आस्था अग्रवाल यांनी अपंगत्व असतांना देखील त्याचा न्यूनगंड न बाळगता जिद्दीने कशाप्रकारे उत्तम कार्य करावे व आरोग्यविषयक काळजी घ्यावी याविषयी सांगितले.  उद्योजिका संध्या सूर्यवंशी यांनी उद्योग – व्यवसाय स्वयंरोजगार ,  रूपाली वाघ यांनी शैक्षणिक , मंगला पाटील यांनी राजकीय, डॉ. सुषमा चौधरी यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तर निवेदिता ताठे यांनी महिलांना उदभवणाऱ्या  समस्यांना कसे सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक दीपिका भामरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार अमोल कोल्हे यांनी मानले. यशस्वीतेसाठी रमेश पाटील, विक्रम महाले, विजया भामरे, आभा नाईक, भरत सुतार यांनी कामकाज पहिले.  सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा जबाबदारीने उत्तमरीत्या काम करीत आहेत.  महिला पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाहीत व महिलांना कुठलेही कार्य अशक्य नाही. 

 

 

Protected Content