पानीपतचा पहिला लूक सादर : ६ डिसेंबरला होणार प्रदर्शीत

panipat postar

मुंबई प्रतिनिधी । आशुतोष गोवारीकर यांच्या बहुचर्चीत पानीपत या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले असून या सिनेमा ६ डिसेंबरला प्रदर्शीत होणार आहे.

पानीपत ही मराठा इतिहासातील एक भळभळणारी जखम आहे. आजही मराठी माणूस पानीपतला विसरला नाही. नेमक्या याच लढाईवर आधारित चित्रपट आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शीत केलेला आहे. यात संजय दत्त, अर्जुन कपूर, कृती सनोन, झीनत अमान, पद्मीनी कोल्हापुरे, मोहनशी बहल आदींच्या प्रमुख भूमिका आहेत.

१४ जानेवारी १७६१ रोजी सदाशीवभाऊ पेशवा यांच्या नेतृत्वाखालील मराठा फौज आणि अहमदशहा अब्दालीच्या अफगाणी सैन्यात झालेल्या पानीपत येथील लढाईच्या कथानकावर हा चित्रपट तयार करण्यात आलेला आहे. आशुतोष गोवारीकर यांनी आधीही जोधा-अकबर, मोहेंजोदारो, खेले हम जी जान से आदी ऐतिहासीक कथानकांवर आधारित चित्रपट दिग्दर्शीत केले आहेत. यासोबत लगानच्या कथानकालाही ब्रिटीशकालीन कालखंडाची पार्श्‍वभूमि होती. या अनुषंगाने आता पानीपतसारख्या अतिशय व्यापक पट असणार्‍या लढाईवरील चित्रपटाने उत्सुकता वाढवली आहे. या चित्रपटाचे पोस्टर रसिकांसाठी सादर करण्यात आले असून याची रसिकांना उत्सुकता लागली आहे.

Protected Content