अमळनेर येथील यात्रोत्सवात भाविकांना पन्ह वाटप

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील राजे संभाजी मित्र परिवाराच्या वतीने भाविकांना पन्हं वाटप करण्यात आले.

येथील सद्गुरू सखाराम महाराज पालखी मोहत्सव निमित्त राजे संभाजी मित्र परिवार च्या वतीने राजे संभाजी चौक(दगडी दरवाजा) येथे यात्रे करू भाविकांचा साठी स्व. जयेश पाटील, सौ. रेखा देसले, स्व. वासुदेव चौधरी, स्व. नथू सूर्यवंशी, स्व.चंद्रकांत देसले,स्व. भिमराव पाटील यांचा स्मरणार्थ चिंचेचे पन्हं वाटप करण्यात आले.

सालाबादप्रमाणे या वर्षी पालखी मोहत्सव निमित्त माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या हस्ते विठू माऊलीची प्रतिमा पूजन करून चिंचचे पन्ह वाटपास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी राजे संभाजी मित्र परिवाराचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content