जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कोरोना संसर्गामुळे दोन ते तीन वर्ष निर्बधामध्ये साजरा केला जाणरा पोळा सण शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
बैलपोळ्यानिमित्त तरुणांनी तसेच शेतकऱ्यांनी एकत्र येते डि.जे.लावून गावातुन मिरवणूक काढली.
ग्रामीण भागात बैलपोळ्याला विशेष महत्व असून वर्षभर शेतात शेतकऱ्याबरोबर राब – राब राबणाऱ्या बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा होतो मात्र मागील दोन-तीन वर्षाच्या कालखंडानंतर व अतिवृष्टीच्या सावटातून सावरत शेतकरी बांधवांनी यावर्षी गावातील आप आपली बैल सजवून त्यांना झुंली,गोंडे, बाशिगे बांधून मोठ्या उत्साहात पांरपारिक पध्दतीने ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन बैलांची गावातुन डी.जे वाजवून मिरवणूक काढली तर या मिरवणुकीमध्ये उपस्थित तरुणांनीही ठेका धरला.
दरम्यान आजच्या यांत्रिकी करणाच्या युगात ट्रॅक्टरव्दारे शेती कामे केली जात असल्याने बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे मात्र अजूनही पारंपारिक पद्धतीने पोळा सण शेतकरी आवर्जून साजरा करतात बैल नसलेले लोक मातीच्या बैलांची पूजा करतात.
घरोघरी पुरणपोळीच्या नैवेद्य करण्यात येतो वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या मुक्या जनावरांप्रति उतराई होण्याचा दिवस म्हणून पोळा सण पाळधीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा व्हावा, यासाठी येथील तरुण कमलाकर पाटील, विश्वजीत पाटील, सचिन पाटील, शुभम पाटील, मनोज पाटील, नितीन पाटील, सत्यवान पाटील, योगेश पाटील, किरण पाटील, स्वप्नील पाटील, निखील पाटील, हर्षल पाटील, निलु पाटील, देवराम पाटील,भारत कुंभार, अविनाश पाटील, दिपक पाटील, अंकुश पाटील, अलताप पठाण, गोपाल शेळके, विशाल भुसारी, आर्यन पाटील, निलेश चौधरी, मयुर चौधरी, किशोर वाघ आधी तरुणांनी एकत्र येऊन पोळा सण डीजे लावून ग्रामदैवत असलेल्या मारुती च्या मंदिरांचे दर्शन घेऊन मिरवणुक काढण्यात आली.