वसई ते यावल पायी प्रवासातनागरीकांनी केलेली मदत आयुष्यभर विसरणार नाही : बिहारीलाल यादव

 

यावल, प्रतिनिधी । वसई नाशिक ते यावल हा तीनशे किलोमीटरचा पायी प्रवासानंतर यावल येथून एस. टी. बसद्वारे परप्रांतीयांना मोफत त्यांच्या राज्यात सोडण्यात आल्याने त्यांनी महाराष्ट्रीय नागरिकांची पायी प्रवासात जातीधर्म विसरून मदत केल्याचे आवर्जून सांगितले.

पिछले कुछ सालो से हम वसई मे अपने परिवार के साथ मजदुरीकर साथ रहकर सुख से जिंदगी गुजार रहे थे । मगर अचानक दो महीना पहेले कोरोना नाम की सबसे खतरनाक जानलेवा बिमारी की खबर मालुम पडी और पुरे देश मे लॉक डाऊन लगाया दिया गया । जिस कारण कंपनी ने भी अपना काम बंद कर दिया । ऐसे समय बिना काम के पैसा कहांसे लाए ? और परिवार को क्या खिलाए ? इस दुविधा स्थिती मे आखीर हमने अपने गाव किसी भी हालात मे जाने निश्चय कर लिया । हम अपने परिवार के नाशिक होते पाच दिनों तिन सौ किलो मिटर का पैदल सफर करते हुए यावल पहुच गये । अशी माहीती सिद्धी जिल्ह्यातील राहणारे बिहारीलाल यादव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

कोरोना आजारामुळे लावण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे आमच्या सारख्या शेकडो परप्रांतीय मजुर कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असुन हा आमच्या आयुष्यातला सर्वात भयानक कधी न विसरणारा प्रसंग असल्याचे सांगुन अनेक संकटांशी लढत आम्ही इथ पर्यंत पहोचलो आहे. या वसई नाशिक ते यावल पर्यंतच्या तिनशे किलोमिटरच्या खडतर पायदळी प्रवासात आम्ही ज्या ज्या ठीकाणी मुक्कामास थांबलो त्या गावातील नागरीकांनी जातीभेद, धर्म विसरून माणुसकी धर्माचे पालन करीत आम्हास शक्य होईल ती मदत त्यांनी केली. त्यांनी केलेल्या संकटासमयी मदतीला आम्ही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधीही विसरणार नसल्याचे सांगुन त्यांचे मन गहीवरून आले. अश्रुनी त्यांचे डोळे पाणावले. अखेर सात तासाच्या प्रतिक्षेनंतर यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर , आगार व्यवस्थापक एस.व्ही. भालेराव, स्थानक निरीक्षक जि.पी. जंजाळ, वाहतुक नियंत्रक संदीप अडकमोल, एस. यु. मोरे, कमलाकर चौधरी, खतीब तडवी, नोडल अधिकारी दिनेश कोते. त्यांचे सहाय्यक रविन्द्र पाटील यांच्या प्रयत्नानी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बिहारीलाल यादव त्यांचे दोन भाऊ, पत्नी व ४ वर्षाची चिमूकली व तिन वर्षाच्या मुलांचा मोफत बसचा प्रवास तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत बऱ्हाटे यांनी केलेल्या आरोग्य तपासणी नंतर सुरू झाला. यादव कुटुंबांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले व आपल्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले .

Protected Content