पाझर तलावाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई ; जि. प. सदस्य सोनावणेंची मागणी

download 1

यावल, प्रतिनिधी | जि. प. सदस्य प्रभाकर सोनावणे यांनी नागादेवी पाझर तलावाचे निकृष्ट काम काणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी  मागणी केली. ते वल येथील काल धनश्री चित्र मंदीरच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, कृषी संशोधन परिषदचे उपाध्यक्ष ना. हरीभाऊ जावळे, आमदार चंदकांत सोनवणे व विविध विभागातील कृषीतज्ञांच्या उपस्थितीत केन्द्र शासनाचे राष्ट्रीय जलशक्ती अभीयानाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात बोलत होते.

 १ कोटी रुपये खर्च करून नुकतेच दुरुस्त करण्यात आलेले नागादेवी  पाझर तलावास गळती लागुन तो फुटीच्या मार्गावर जातो ही बाब तालुक्यातील ना. हरिभाऊ जावळे व आमदार चंद्रकांत सोनवणे यांना निदर्शनास आणुन देत नागादेवी पाझर तलावाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कारवाही करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी कार्यशाळेला उपस्थित मान्यवरांसमोर केली. या संदर्भात अधिक माहीती घेतली असता नागादेवी पाझर तलावाच्या साठवण पाण्याचा आउटलेट करण्यात येवुन पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पाझर तलावातील पाणी साठवण किमान १० फुट कमी झाली असल्याची माहीती समोर येत असुन, एक दोन दिवसात पावसाच्या पाण्याची परिस्थिती पाहुन या पाझर तलावाच्या गळती शोध पाणबुडी व्दारे घेण्यात येणार आहे, पाझर तलावाच्या सर्व परिस्थितीवर जलतज्ञ व्ही.डी. पाटील यांच्यासह प्रशांत अराक, विसपुते, जाधव आणी कुलकर्णी हे मागील दोन दिवसापासुन या ठिकाणी तळटोकुन असुन त्यांना पंचायत रामिती सदस्य शेखर सोपान पाटील दहिगावचे देवीदास धांगो पाटील व परिसरातील शेतकरी बांधवांचे व सामाजीक कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळत आहे.

Protected Content