कोरोना : फ़ैजपूर शहरात रामनवमीनिमित्ताने ९ दिवे लावून साकडे

फैजपूर, प्रतिनिधी । भारताला या महामारीपासून लढण्याची, वाचण्याची आणि वाचवण्याची शक्ती प्रभू श्रीरामाकडे रामनवमीला संध्याकाळी घरासमोर ९ दिवे लावून साकडे टाकण्यात आले

प्रभू श्रीरामचंद्र यांनी आपले वडील सुर्यवंशी दशरथ राजा यांनी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आपल्याला १४ वर्ष वनवास व आपला भाऊ भरतला अयोध्या चा राजा बनवण्यात यावे. हे माता कैकयीला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी वनात गेले. फैजपूर शहरात रामनवमीनिमित्त गुरुवार दि. २ एप्रिल रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता आपल्या घराबाहेर, कंपाउंड, घरोघरी वॉलवर ९ तेलाचे दिवे लावण्यात आले. त्यामध्ये कापूरची पावडर करुन टाकण्यात आली. यामुळे वातावरण शुद्ध आणि पवित्र होईल. कोरोनाच्या महाभयंकर संकटात अडकलेल्या आपल्या भारताला सुखरूपपणे बाहेर पडण्यासाठी, आपल्या सर्वांना वाचवण्यासाठी धडपडत असलेल्या डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छतादूत आणि पोलीस यंत्रणा या सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी प्रभू श्रीरामांना साकडे घालण्यात आले.

Protected Content