गणेश मंडळांनी श्रींची मूर्ती संकलन केंद्रात द्यावी

 

रावेर, प्रतिनिधी। रावेर शहर व परिसरात उद्या होणाऱ्या गणेशमुर्ती विसर्जनाच्या निमित्ताने गणेश मंडळाचे अध्यक्षांची आज उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या अध्यक्षते खाली बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्व गणेश मंडळ अध्यक्षांनी आप-आपल्या परीसरातील गणेश मूर्ती संकलन केंद्रांत देण्याचे आवहान करण्यात आले.

रावेर शहर व परिसरात उद्या गणेशमूर्ती विसर्जन निमित्ताने सर्व अध्यक्षाची बैठक रावेर पोलिस स्टेशनला घेण्यात आले.यावेळी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे,साहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक पालिकेचे मुख्यधिकारी रविंद्र लांडे,उपनगराध्यक्ष राजेंद्र महाजन,यांनी बैठकीला मार्गदर्शन केले शहरात संकलन केंद्र व फिरते मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आले आहे.

सार्वजनिक व खाजगी गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन सकाळी ११ ते दुपारी २ च्या दरम्यान करण्यात यावे.  श्री च्या मूर्तीचे विसर्जन  निंभोरा सिम येथील तापी नदी पूल, मंगरूळ धरण, अभोडा धरण या ठिकाण करण्यात यावे. रावेर पोलीस स्टेशनकडून अजनाड येथील पोहणारे, बचाव पथक नेमण्यात आले आहे. सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्त्यांनी ४ पेक्षा जास्त लोकांनी जाऊ नये, लहान मुले, वयस्कर लोकांनी जाऊ नये,स र्वांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे.

नगरसेवक राजेंद्र महाजन, अंबिका व्यायाम शाळेचे प्रमुख भास्कर महाजन यांनी गणपती संकलन वाहनात करणार आहेत. श्रीच्या विसर्जनच्या वेळी चार पेक्षा जास्त व्यक्ती  जावू नये.  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मिरवणूक व वाद्यास परवानगी नाही.  शांततेत विसर्जन करण्याबाबच्या सूचना देखील बैठकीत देण्यात आल्या आहे.

Protected Content