यावल तालुक्यातील आदीवासी पाड्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची भेट

yawal adiwasi pada

यावल( प्रतिनिधी)। तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या अतिदुर्गम भागातील जामन्या गाडऱ्या या आदीवासी पाडयांवर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी अचानक भेट देवुन विविध विभागातील प्रशासकीय कामांची पाहणी केली.

 

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बुधवारी १९ जुन रोजी सकाळी अचानक गाडऱ्या जामन्या, उसमळी, लंगडा आंबा या ग्रुप ग्रामपंचायतच्या पाडयांवर येवून थांबल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. पाटील, विभागीय प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले, वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक ए.एस. भवर, वनपरिक्षेत्र अधिकारी जामन्या अक्षय मेहत्रे, यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांच्यासह वनसंरक्षक, वनपाल, प्राथमिक आरोग्य विभाग, अंगणवाडी, वन विभाग, पंचायत समितीचे विविध अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, गाडऱ्या जामन्या, वन विभागाच्या विविध कामांची पाहणी केली. त्याचबरोबर घरकुल, जलयुक्त शिवारची कामांची पाहणी करून आदीवासी बांधवांच्या समस्या व अडचणी जाणुन घेतल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या ह्स्ते ग्रामपंचायत च्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच शापेबाई बारेला, ग्रामविकास अधिकारी रूबाब तडवी आदी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content