मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एका २२ वर्षीय तरुणाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. ७ जून रोजी मुंबईत ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे की, आरोपी तरुण हा मुंबईतल्या एका दुकानात काम करत असून हे दुकान पीडीत मुलगी राहते, त्याच भागात आहे. ७ जून रोजी दुपारी ही मुलगी काही वस्तू खरेदी करण्यासाठी त्याच्या दुकानात गेली होती. त्यावेळी दुकानात कोणी नसल्याचा फायदा घेत, त्याने मुलीला दुकानात आत नेले, तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर मुलीने वेदना होत असल्याचे तिच्या पालकांना सांगितलं होते. तसेच रविवारी आईबरोबर त्या दुकानासमोरून जात असताना तिने घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी दुकानात पोहोचत आरोपीकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने आपण लैंगिक अत्याचार केल्याचं मान्य केलं. तसेच त्याने त्या ठिकाणीहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.