जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार

शेगांव, प्रतिनिधी ।  जिल्हा परिषद उपविभागीय कार्यालय खामगाव मधील आपली सेवा पूर्ण करीत नियतवय मानाने सेवानिवृत्त झालेले कुर्षणराव वामनराव पाटील (रा. शेगांव) जि. प. बांधकाम उपविभागाचे कार्यकारी अभियंता आर. बी. परदेशी यांच्या उपस्थितीत निरोपाचा सत्कार सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला.

 

कुर्षणराव पाटील यांच्या सत्कार सोहळ्यास अध्यक्ष  आर. बी.परदेशी ,उपविभागीय अभियंता एस. एस. गुडदे ,  जळगाव जामोद प्रभारी उपविभागीय अधिकारी  यु. पी. बुरजे, सदफळे ,प्रमुख पाहुणे ज्ञानदेवराव मानकर ,विनोद टिकार यांची उपस्थिती होती.  कृष्णराव पाटील यांनी आपल्या सेवाकाळात तीन वेळा पदोन्नती घेत वयाची ३७  वर्ष सेवा पूर्ण करीत सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.  उपस्थित अधिकारी व  यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून श्री विठ्ठल रुक्मिणी फोटो, कपड्यांचा आहेर तसेच विविध भेट वस्तू देऊन त्यांचे उर्वरित आयुष्य सुख-समृद्धी व निरोगी जावो अशी श्रीचरणी प्रार्थना करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला शाखा अभियंता ए. पी. कुळकर्णी, ए. एल .बोरसे ,  व्हीं. डी. पाटील, पी. एम. घाटोळ , चोपडे तसेच लाला सेठ महल्ले,कलीम ठेकेदार, चव्हाण सर ,उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा खामगाव जळगाव जामोद कार्यालयातील कर्मचारी वृंद एस. एस. कुलकर्णी व सहाय्यक एस. के. तायडे कनिष्ठ सहाय्यक कुमारी एम. आर. हिवरकर , मोनाली पाथरकर, मनोज ठोकळ, एस. व्हीं. खडगे, आर. बी. हटकर, जगन राजपूत व कैलास भोपळे परिचर एस. एस. हिवरखेडे व्ही. टी. गिऱ्हे या सह अधिकारी व कर्मचारी  यांची उपस्थिती होती.  सूत्रसंचालन व प्रस्ताविक शाखा अभियंता पी. कुलकर्णी यांनी केले व आभार एस बोरसे यांनी मानले.

माझ्यासारख्या सामान्य कर्मचार्‍याचा मोठ्या अधिकाऱ्यांनी हा निरोप समारंभ साजरा केल्याचे पाहून माझे जीवन धन्य झाले याची देही याची डोळा ,पाहिला माझ्या सत्काराचा सोहळा, ‘यासाठीच केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा, या ओळींनी कृष्णराव वामनराव पाटील यांनी सत्काराला उत्तर देत भाऊक झाले.

 

Protected Content